महिलांनी हक्कांबाबत नेहमी जागरूक राहावे : डॉ. कोल्हे | पुढारी

महिलांनी हक्कांबाबत नेहमी जागरूक राहावे : डॉ. कोल्हे

कोंढवा : पुढारी वृत्तसेवा : ‘समाजाच्या उत्कर्षासाठी महिलांनी आपले हक्क बजावण्याची गरज आहे. तसेच आपल्या हक्कांबाबत महिलांनी नेहमी जागरूक राहणे गरजेचे आहे, ’ असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिननिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महिलांसाठी पाककला, रांगोळी आणि मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात परिसरातील नऊशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. विजेत्या महिलांना डॉ. कोल्हे यांच्या हस्ते परितोषिक वितरण करण्यात आले.

महिलांना आरोग्य व त्यांच्या कर्तव्याबाबत मासूम फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. मनीषा गुप्ते यांनी मार्गदर्शन केले. तसेच माजी आमदार महादेव बाबर, महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी महापौर प्रशांत जगताप, अविनाश बागवे, प्रा. शफी इनामदार यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.नीलेश मगर, प्रवीण तुपे, जाहिद शेख, शकीला इनामदार, डॉ. अबोली इनामदार, डॉ. मुसद्दिक इनामदार, सिराज इनामदार, संजय शिंदे, मोहम्मदीन खान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या कार्याध्यक्ष पहीम इनामदार यांनी केले. सूत्रसंचालन इम्रान शेख यांनी केले. राफिया शेख यांनी आभार मानले.

हेही वाचा

 

 

Back to top button