शहराचे किमान तापमान 10.4 अंशांवर : मार्चमधील नीचांंकी पारा | पुढारी

शहराचे किमान तापमान 10.4 अंशांवर : मार्चमधील नीचांंकी पारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराचे किमान तापमान गुरुवारी राज्यात सर्वांत कमी (10.4)अंशांवर खाली आल्याने ते राज्यात अव्वल ठरले. दिवसा पारा 35 अंशांवर जात असल्याने दोन्ही तापमानातील फरक 25 अंशांवर गेल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
गेल्या सात दिवसांपासून शहराच्या किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. 28 फेब्रुवारी रोजी शहराचे किमान तापमान 18 ते 21 अंशांवर गेले होते. तर कमाल तापमान 33 ते 39 अंशांवर होते.

मात्र मार्च महिना सुरू होताच हवेच्या वरच्या थरात वार्यांचा वेग वाढल्याने किमान व कमाल तापमानातही घट झाली. किमान तापमान 18 वरून 10 ते 12 अंशांवर खाली आले तर कमाल तापमान 38 वरून 35 अंशांवर खाली आले. गुरुवारी शहराचे कमाल तापमान 35 अंशांवर होते तर किमान तापमान 10.4 अंशांवर होते.

पुणे पहाटे महाबळेश्वरपेक्षाही थंड..

शहरातील एनडीए भागाचे किमान तापमान 10.4 तर शिवाजीनगर 11.3 अंशांवर होते. महाबळेश्वरचे किमान तापामान 15.9 अंशांवर होते, त्यामुळे पुणे किमान तापमानात राज्यात अव्वल ठरले.

गुरुवारचे कमाल व किमान तापमान

एनडीए 35 (10.4), शिवाजीनगर 35 (11.3), पाषाण 35 (13.2), लोहगाव 35 (15.2), चिंचवड 37 (17.9), लवळे 37 (20.6), मगरपट्टा 36 (18.6).

हेही वाचा

Back to top button