बैलगाडा शर्यती ग्रामीण अर्थकारणाला चालना देतील : आ. राहुल कुल यांचे मत | पुढारी

बैलगाडा शर्यती ग्रामीण अर्थकारणाला चालना देतील : आ. राहुल कुल यांचे मत

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : बैलगाडा शर्यतींचे आकर्षण नव्या पिढीला लागणे हे बैलगाडा शर्यतीच्या खेळावरील विश्वास दृढ करणारे आहे. भविष्यकाळात बैलगाडा शर्यती ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देतील, असे मत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून दौंडचे आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या संकल्पनेतून शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (दि. 12) भव्यदिव्य बैलगाडा शर्यती (ओपन मैदान) व ’आमदार हिंदकेसरी 2023’चे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी बक्षीस वितरण सोहळ्यात बोलताना आ. कुल बोलत होते.

या वेळी त्यांनी पूर्व हवेलीतील दर्जेदार बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, हवेली बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, सुदर्शन चौधरी, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, उद्योगपती एल. बी. कुंजीर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांच्यासह मोठ्या संख्येने बैलगाडाशौकीन उपस्थित होते. या वेळी प्रथम क्रमांक मिळविणार्‍या विजेत्याला बुलेट, द्वितीय विजेत्याला युनिकॉर्न, तृतीय, चतुर्थ विजेत्यांना आकर्षक दुचाकी, तसेच पाच, सहा व सात नंबरच्या विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली.

या स्पर्धेचे आयोजन शिंदवणे सोसायटीचे संचालक सचिन मचाले व उद्योजक सागर म्हस्के यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पोपट महाडीक, ओंकार मांढरे, अजित पवार, गणेश मचाले, गुरुनाथ मचाले, शिवाजी महाडीक, बापू खेडेकर, अभिजित महाडीक, राहुल कड, भीमराव शितोळे, विक्रम महाडीक, शांताराम महाडीक, किरण महाडीक यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, पूर्व हवेलीत भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन केल्याने शर्यती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

विजेते बैलगाडामालक पुढीलप्रमाणे

प्रथम – मोहिल धुमाळ, दैवत गोवेकर
द्वितीय – खानेकार बंधू ,गोठावाडे मुळशी
तृतीय – सुभाषतात्या मांगडे
चतुर्थ – गौतमभैया काकडे
पाचवा – पिंटूशेठ मोडक
सहावा – नंदू सागडे, समीरभैया इस्लामपूर.

हेही वाचा

Back to top button