कुदळवाडी घाटात ‘द बर्निंग कार’ | पुढारी

कुदळवाडी घाटात 'द बर्निंग कार'

कडूस : पुढारी वृत्तसेवा : चास येथून कुदळवाडीच्या दिशेने जाणाऱ्या मिरजेवाडी (ता. खेड)- कुदळवाडी घाटात ओमिनी गाडीने गरम होऊन अचानक पेट घेतला. भर वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
घनवटवाडी, मिरजेवाडी गावच्या परिसरातील घाटात शनिवारी (दि. १३) दुपारी दीड वाजेच्या सुमारास रस्त्यावरून जात असणाऱ्या गाडीला अचानक आग लागली.

गाडीत असणाऱ्या गँसचा स्फोट होईल या भीतीने काही नागरिकांनी पळ काढला; मात्र प्रसंगावधान राखत कडधे गावचे उपसरपंच सचिन नाईकडे, दिगंबर नाईकडे, गणेश नाईकडे, मनोहर आंद्रे, शंकर मुळूक आदी नागरिकांनी गाडीतील नागरिकांना बाहेर काढले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र संपूर्ण गाडी जळून खाक झाली.

हेही वाचा

 

Back to top button