Pimpri News : बाजारात आकाश कंदिलांचा झगमगाट | पुढारी

Pimpri News : बाजारात आकाश कंदिलांचा झगमगाट

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीची रोषणाई खर्‍या अर्थाने जाणवते ती लुकलुकणार्‍या दिव्यांच्या माळा आणि झगमगणार्‍या आकाश कंदिलांमुळेच. रस्त्यावरच्या आकाश कंदिलांच्या स्टॉल्समुळे दिवाळीची चाहूल जाणवत आहे. दिवाळीची शोभा वाढवणारे वेगवेगळ्या आकारातील आणि आकर्षक रंगातील आकाश कंदील विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहेत.

100 पासून 1 हजार रुपयांपर्यंत त्यांच्या किंमती आहेत. यामध्ये हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहे. पॉल, मेटॅलिक, चायना प्लास्टिकचे प्रकार रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोजन कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंग कंदील, मेटल स्टार, लोटस, फायरबॉल, झगमगते आकाश कंदील. विविध कलाकृतीचे, रचनात्मक आकाराचे आकाश कंदील पहायला मिळत आहेत.

तसेच कंदिलाबरोबर रोषणाईसाठी लाईटच्या विविध प्रकारच्या शोभिवंत माळा विक्रीकरता ठेवण्यात आल्या आहेत. विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक आकाराचे आकाश कंदील पहायला मिळत आहेत. त्यात चौकोनी, गोलाकार, दिवा, चांदणी असे प्रकार आहेत. बांबूपासून तयार केलेले आकर्षक आकाश कंदील बाजारात विक्रीसाठी आले आहेत. पारंपरिक, पर्यावरणपूरक आकाशकंदील खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.

नावीन्यपूर्ण मायक्रॉन, बांबूच्या काड्यांचे आकाश कंदिल

कागद आणि कापडाबरोबरच मायक्रॉन आणि बांबूच्या काड्यांपासून बनविलेले आकाश कंदील हे वेगळेपणा जपत आहेत. मायक्रॉनच्या रंगबेरंगी धाग्यापासून सुरेख विणकाम केलेले आकाश कंदील लक्षवेधी ठरत आहेत.
तर बांबूच्या काड्यापासून तयार केलेले आकाश कंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे.

हेही वाचा

पंतप्रधान मोदींचे विमान उतरले गोंदियात; प्रफुल्ल पटेल स्वागताला

ठाण्याचा ‘डॉन’ जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

ठाण्याचा ‘डॉन’ जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

Back to top button