पिंपरी : पालिकेने ठेकेदारांचे नावच बदलले | पुढारी

पिंपरी : पालिकेने ठेकेदारांचे नावच बदलले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे गायरान जागेतील 15 एकर जागेत आठ मजली रुग्णालय बांधण्यात येणार आहे. त्याचा खर्च 340 कोटी आहे. या रुणालयाची सीमाभिंत बांधण्याचे 10 कोटींचे काम सिद्धनाथ कॉर्पोरेशनला देण्यात आले आहे. मात्र, सिद्धनाथ कॉर्पोरेशनऐवजी सिद्धनाथ कन्स्ट्रक्शनला काम देण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. ठेकेदाराचे नावच बदलण्याचा पराक्रम स्थापत्य प्रकल्प विभागाने केला आहे.

संबंधित बातम्या :

विश्वासाच्या नात्यातून घेतला जातो वैद्यकीय सल्ला

पिंपरी : गौराईच्या आकर्षक मुखवट्यांनी सजली बाजारपेठ

पिंपरी : अनधिकृत बांधकाम मालमत्ता नोंदणीचा मार्ग मोकळा

वायसीएम रुग्णालयाच्या धर्तीवर चिखलीऐवजी मोशी येथे 750 बेडचे रुग्णालय बांधण्यात येत आहे. त्यात विविध वैद्यकीय विभाग असणार आहेत. पालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या रुग्णालयाची सीमाभिंत बांधण्याच्या कामाची निविदाप्रक्रिया राबविली होती. त्यात 6 ठेकेदारांनी निविदा भरली. त्यातील तीन ठेकेदार पात्र ठरले. ते काम लघुत्तम दर असलेल्या सिद्धनाथ कॉर्पोरेशनला मंजूर करण्यात आले.
दरम्यान, ठेकेदाराच्या नावात बदल केल्याने संबंधित लिपिकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. लिपिकाच्या नजरचुकीमुळे ठेकेदाराच्या नावात बदल झाला. स्थायी समितीची मंजुरी घेऊन नावात योग्य तो बदल करण्यात आला आहे, असे प्रकल्प स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

मात्र, लिपिकांने नजरचुकीने ठेकेदाराचे नाव सिद्धनाथ कॉर्पोरेशनऐवजी सिद्धनाथ कन्स्ट्रक्शन असे केले. त्या प्रस्तावाला आयुक्त सिंह यांनी 9 ऑगस्ट 2023ला स्थायी समितीची मंजुरी दिली. त्यानंतर ठेकेदाराचे नावच चुकीचे असल्याने अधिकार्‍यांच्या लक्षात आले. त्यानंतर विभागाचा गोंधळ उडाला. शोध घेतल्यानंतर लिपिकांमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आहे. त्यानंतर नाव दुरुस्त करून नव्याने प्रस्ताव तयार करून 6 सप्टेंबर 2023 च्या स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

हेही वाचा

पिंपरी-चिंचवड शहराचा उद्या पाणीपुरवठा बंद

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे प्रश्न मार्गी

महाराष्ट्राची शान असलेल्या ‘खिल्लार’ला पोहोचविले घराघरांत

Back to top button