पिंपरी : गौराईच्या आकर्षक मुखवट्यांनी सजली बाजारपेठ | पुढारी

पिंपरी : गौराईच्या आकर्षक मुखवट्यांनी सजली बाजारपेठ

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. त्यातच बाजारात दाखल झालेल्या गौराईच्या आकर्षक मुखवट्यांची महिलांना भुरळ पडली आहे. तर गौराईच्या विविध सजावटीच्या वस्तूंची खरेदीसाठी महिला दंग झालेल्या दिसत आहेत. त्यामध्ये विविध दागिने, रेडिमेड साड्या , गौरीचा साज, मुखवटे त्यातच कापडी, शाडू, फायबर, पीओपी अशा तीन ते चार प्रकारच्या मूर्ती उपलब्ध आहेत.

विविध रंगांच्या मूर्तीला मागणी ः गुलाबी, ग्लोसी, क्रिम, पिस्ता, स्कीन, अशा विविध रंगांचा वापर करून गौराईचे आकर्षक मुखवटे बाजारात उपलब्ध आहेत. गंगा गौरी, शंकर पार्वती 3000 ते 3500 , कापडी मूर्ती 1200 ते 600, पीओपी 1500 ते 1800, मोठ्या आकाराची मूर्ती 2000 ते 3000, फायबर जोडी 6000, गौरीच्या लहान मुलगा, मुलगी प्रत्येकी जोडी 1000, लक्ष्मी 800 ते 500, फेटा 2000, त्यामध्ये संपूर्ण सेट असलेल्या मूर्ती 20000, 18000, 16000 असे दर आहेत. तसेच मोठ्या आकाराचा स्टँड 1500, लहान स्टँड 350 ते 500 असे दर आहेत.

फेटे असलेल्या गौरीला मागणी ः यंदा फेटे असणार्‍या गौरी महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच फेटादेखील मूर्तीच्या आकाराप्रमाणे लहान स्वरुपाचा आहे. त्यामुळे मुखवटा अगदी सुंदर, आकर्षक दिसत आहे.

हेही वाचा

100 वर्षांपासूनचा रस्ता वाद निघाला निकाली

पिंपरी-चिंचवड शहराचा उद्या पाणीपुरवठा बंद

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे प्रश्न मार्गी

Back to top button