पिंपरी-चिंचवड शहराचा उद्या पाणीपुरवठा बंद | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहराचा उद्या पाणीपुरवठा बंद

पिंपरी : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रात विद्युतविषयक अत्यावश्यक ए.बी.टी मीटर बसविण्यात येणार आहे. या कारणास्तव रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा शुक्रवार (दि. 15) सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

या कालावधीत रावेत येथील जलउपसा बंद राहणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. काटकसरीने पाणी वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.

हेही वाचा

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे प्रश्न मार्गी

महाराष्ट्राची शान असलेल्या ‘खिल्लार’ला पोहोचविले घराघरांत

मासेमारीसाठी गेलेली बोट मढ कोळीवाड्याच्या पश्चिम समुद्रात बुडाली, ७ जणांना वाचवले

Back to top button