पिंपरी- चिंचवड शहरात पीएमपीची नव्या मार्गावर सेवा | पुढारी

पिंपरी- चिंचवड शहरात पीएमपीची नव्या मार्गावर सेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पीएमपी प्रशासनाने शहरात नागरिकांच्या मागणीनुसार, नव्या मार्गावर काही गाड्यांची तर काही ठिकाणी विनावाहक जलदसेवा सुरू केली आहे. शुक्रवार, (दि. 1) रोजी पासून ही सेवा सुरू झाली असून, प्रवाशांचा या सेवेस उत्तम प्रतिसाद लाभल्याची माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

शहरातील विस्तारित बस मार्ग
देहूगाव ते मोशी या मार्गाचा विस्तार करून, भोसरीपर्यंत वाढविण्यात आला. ही बस मोशीगाव, मोईफाटा, चिखली आणि तळवडे या मार्गामधून दर दीड तासाने धावणार आहे.

विनावाहक जलदसेवा
भोसरी ते मनपा भवन ही विनावाहक जलद बससेवा सुरू झाली आहे. ही बस लांडेवाडी, कासारवाडी, फुगेवाडी, वाकडेवाडी या मार्गात दर तासाला धावणार आहे.

हे आहेत शहरातील नवीन बसमार्ग
निगडी ते जांबे ही बस दर तासाला आकुर्डी रेल्वे स्टेशन, वाल्हेकरवाडी आणि पुनावळे या मार्गामधून धावणार आहे. पिंपरी मेट्रो स्टेशन ते किवळेगाव ही बस चिंचवडगाव, धर्मराज चौक, इस्कॉन मंदिर, शिंदे वस्ती, आर्दशनगर व मुकाई चौक या मार्गात दर दोन तासाला धावणार आहे.

हेही वाचा :

Maratha Reservation Protest : जालन्यातील लाठीचार्जचा जामखेडमध्ये तीव्र निषेध! उद्या तालुका बंदची हाक

पिंपरी : तहसीलदारास धक्काबुक्की करणार्‍या दाम्पत्यावर गुन्हा

Back to top button