बालभारती विकणे आहे ! अशी जाहिरात झळकली आणि… | पुढारी

बालभारती विकणे आहे ! अशी जाहिरात झळकली आणि...

पुणे : राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ अर्थात ‘बालभारती’ या राज्य शासनाच्या संस्थेच्या संकेतस्थळाचे डोमेन दोन हजार यूएस डॉलर किमतीला विकणे असल्याची जाहिरात झळकल्याने मंगळवारी एकच गोंधळ उडाला. दरम्यान, ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई, अभ्यासक्रम संशोधन करणार्‍या ‘बालभारती’ या राज्य सरकारच्या संस्थेचे Rbalbharati.in हे अधिकृत डोमेन आहे. ते 2005-06 या वर्षात घेण्यात आले आहे. तर या डोमेनच्या नूतनीकरणाची पुढील पाच वर्षांची प्रक्रिया 2023 मध्ये केली आहे. त्यानंतरही कोणीतरी डोमेनबाबत खोडसाळपणा केल्याचे दिसून येत असल्याचे अधिकार्‍यांच्या वतीने सांगण्यात आले.

या प्रकरणाचा तांत्रिक अहवाल घेतला असून, सायबर पोलिसांकडे कायदेशीर तक्रार करण्यात आली आहे. हा नेमका काय प्रकार झाला आहे? याची माहिती संकलित करण्याची कार्यवाही सध्या सुरू असून, माहिती घेतली जात आहे.
                                       कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती

Back to top button