पुणे : पीएमपीएल चालक खून प्रकरणाचा छडा चौघे जेरबंद | पुढारी

पुणे : पीएमपीएल चालक खून प्रकरणाचा छडा चौघे जेरबंद

पुणे पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएल चालक खून प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाला २४ तासाच्या आत यश आले आहे. याप्रकरणी आत्तार्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे.

विरोधी व्यक्तीला एका गुन्ह्यात जामीन राहिल्याच्या कारणातून हा खून झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ऋषीकेश संजय बोरगावे (वय.31,रा.भेकराईनगर फुरसूंगी),अक्षय हनुमंत जाधव (वय.21,रा. फुरसूंगी),प्रज्वल सचिन जाधव (वय.20,रा. काळेपडळ), तुषार सुर्यकांत जगताप (वय.21, गाडीतळ हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. पीएमपीएल चालक चा रस्त्यात गाठून खून करण्यात आला होता.

अक्षय जाधव
अक्षय जाधव

यातील ऋषीकेश व अक्षय या दोघांना उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरागा येथून तर इतर दोघांना पुणे परिसरात ताब्यात घेतण्यात आले आहे. अन्य एका फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

पुढील चौकशीसाठी चौघांना लोणीकाळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुंखे (वय.29,रा पापडेवस्ती फुरसूंगी) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे.

पीएमपीएल चालक खून प्रकरणी पत्नी योगीता गौतम साळुंखे (वय.28) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे.

 

अधिक वाचा :

पीएमपीएल चालक ला रस्त्यात गाठून त्याचा निर्घृण खून करून चेहरा विद्रूप करून मृतदेह हांडेवाडी परिसरातील मोकळ्या जागेत टाकल्याचा प्रकार रविवारी (दि. 11) दुपारी उघडकीस आला होता.

गौतम हे गेल्या अडीच वर्षांपासून पीएमपीएल चालक म्हणून नोकरीस होते. शनिवारी दुपारी ते कामावर जाण्यासाठी आपली दुचाकी घेऊन बाहेर पडले होते.

अधिक वाचा :

पप्पु बोरगावे
पप्पु बोरगावे

स्वारगेट ते धायरी या पीएमपीएल बसवर त्यांनी दिवसभर काम केल्यानंतर रात्री पावणे दहाच्या सुमारास स्वारगेट डेपोत बस लावून ते घरी जाण्यासाठी बाहेर पडले.

परंतु, रविवारची सकाळ उजाडल्यानंतरही ते घरी न परतल्याने त्यांच्या सासर्यांनी स्वारगेट डेपोत जाऊन गौतमबाबत चौकशी केली. परंतु, तेथे त्यांना रात्रीच गौतम ड्युटी संपून गाडी डेपोत लावून घरी गेल्याचे समजले.

परंतु, गौतम दिवसभर घरीच न आल्याने त्यांनी इतरत्र विचारपूस केली.

 शेवटी त्यांना गौतमचा खून करून त्याचा चेहरा दगडाने विद्रूप करून मृतदेह हांडेवाडी परिसरातील मोकळ्या जागेत टाकून दिल्याची माहिती चार वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली होती.

अधिक वाचा :

दरम्यान गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकातील पोलिस नाईक नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले,ऋषीकेश टिळेकर यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना हा खून ऋषीकेश बोरगावे व अक्षय जाधव यांनी केला असल्याचे समजे. सध्या ते दोघे उस्मानाबाद येथे पळून गेले आहेत.

त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून लॉडवरून ऋषीकेश व अक्षय या दोघांना अटक केली.

तुषार जगताप
तुषार जगताप

त्यांच्याकडे अधीक चौकशी केली असता, आकाश राठोड़, प्रज्वल जाधव व तुषार जगताप यांच्या मदतीने पीएमपीएल चालक गौतम उर्फ अमोलचा खून केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने केली.

म्हणून पीएमपीएल चालकचा काढला काटा ?

याबाबत बोलाताना पोलिसांनी सांगितले की, आरोपींची मागील काही दिवसापुर्वी गौतम उर्फ अमोल याच्या एका मित्रासोबत वाद झाले होते. तो देखील पीएमपीएल चालक म्हणून काम करतो.

याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्या गौतम हा त्याला जामीनदार झाला होता.

तेव्हापासून आरोली गौतमवर चिडून होते. त्यातूनच त्यांनी दारु पिण्याच्या बहाण्याने पीएमपीएल चालक गौतमला रिक्षात बसवून हांडेवाडी परिसात नेले.

तेथे गेल्यावर दारु पिल्यानंतर पीएमपीएल चालक गौतमला मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी दगडाने ठेचून चेहरा विद्रुप केला होता. त्यानंत तेथून सर्वांनी पळ काढला.

हेही वाचले का?

पाहा : कोयना पर्यटना स्थळांचे फोटो

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button