करुळ घाट मार्ग खचल्याने ये – जा करणाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन | पुढारी

करुळ घाट मार्ग खचल्याने ये - जा करणाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन

वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा : वैभववाडी – कोल्हापूर मार्गावर करुळ घाट येथे गेले तीन दिवस संततधार पावसामुळे करूळ घाटमार्गची साईडची मोरी खचलेली आहे. सदर ठिकाणी पोलिसांनी बॅरी गेट लावण्यात आलेला आहे.

पाऊसाचा जोर कायम असल्याने सदर ठिकाणी अजून रस्ता खचण्याची शक्यता असल्याने घाट रस्ता बंद करणे बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.

सध्या या मार्गावरून कोल्हापूर सिधुदुर्ग जिल्ह्याकडे वाहनांची ये – जा सुरू आहे. पावसाचा जोर वाढला तर करुळ घाट मार्ग धोकादायक होऊ शकतो. त्यामुळे करुळ घाट मार्ग बंद करण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा :

खचलेल्या घाट मार्गाची तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.

खारेपाटणमध्ये पुरजन्य परिस्थिती; खारेपाटणमध्ये पाणी घुसले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने विजयदुर्ग खाडीला पूर आला आहे. खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खारेपाटण गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

रविवापासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत चिंताग्रस्त असलेला कोकणातील शेतकरी या पावसामुळे सुखावला आहे. शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर घेतला आहे.

खारेपाटण येथे पूरपरिस्थितीमुळे शुकनदी पात्राचे पाणी खारेपाटण शहरात घुसले आहे.

खारेपाटण येथे पूरपरिस्थितीमुळे शुकनदी पात्राचे पाणी खारेपाटण शहरात घुसले आहे. खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले आहे. खारेपाटण बाजारपेठमधून बंदरवाडी व सम्यकनगरकडे जाणार रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे.

अधिक वाचा :

मासळी मार्केट इमारतीला पुराच्या पाण्याने वेढले आहे. खारेपाटण बाजारपेठेतून कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे. खारेपाटण मधील बिगे व भाटले येथील शेती पाण्याखाली गेली आहे.

सुमारे ५ फूट पेक्षा अधिक पाणी शेतात गेल्याने पाण्याखाली गेले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इमारतीचा तळमजला पूर्ण पाण्याखाली बुडाला आहे.

पहिल्या मजल्यावरील व्यापारी गाळे धारक पुराच्या भीतीने आपल्या वस्तूची आवराआवर करत आहेत.

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खारेपाटण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे.

खारेपाटण मधील व्यापारी भीतीच्या छायेखाली आहेत.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : जोकर करतोय कोरोना जनजागृती

Back to top button