

महाड; पुढारी वृत्तसेवा : किल्ले रायगड परिसरात असलेल्या घरोशीवाडी – पळसगाव भागात पर्यटकाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला.
माणगाव तालुक्याच्या वेशीवर घरोशीवाडी – पळसगाव गाव आहे. गावाच्या हद्दीत असलेल्या दरीत पर्यटनासाठी पहाड चांभार खिंड येथील पंचवीस वर्षीय युवक गेला होता. पण, त्याचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
स्थानिक ग्रामस्थ आणि महाडमधील बचावकार्यासाठी गेलेल्या पथकाकडून याबाबत माहिती देण्यात आली. माहितीवरुन महाड शहरातील दोन युवक आदित्य कदम आणि मेहुल सावंत गाडीवरून रायगड परिसरातील धबधब्यांचे निरीक्षण आणि आनंद घेण्यासाठी बाहेर पडले होते.
अधिक वाचा :
रविवारी दुपारी उशिरा रायगड परिसरातील महाड माणगाव तालुक्याच्या वेशीवर असलेल्या घरोशीवाडी – पळसगाव परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये गेले होते.
दुपारी साडेचारच्या सुमारास आदित्य कदम हा पाय घसरुन डोंगरावरून सुमारे दीडशे फूट खोल दरीत पडला.
या बाबतची माहिती मेहुल सावंतने महाड येथील साळुंखे रेस्क्यू टीम तसेच शहरातील अन्य मित्रांना दिली. ही माहिती प्राप्त होताच तातडीने साळुंखे रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली.
अधिक वाचा :
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमी अवस्थेतील आदित्य कदमला महाड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले.
प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला मुंबई येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र प्राप्त माहितीनुसार सोमवारी पहाटे चार वाजता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
हेही वाचले का?
पाहा : विंबल्डन विजेत्या अॅश्ले बार्टीचे फोटेज्
[visual_portfolio id="5340"]