पुणे : गूळ, खाद्यतेलांची दरवाढ; साखर, गोटा खोबरे दरात घट | पुढारी

पुणे : गूळ, खाद्यतेलांची दरवाढ; साखर, गोटा खोबरे दरात घट

 

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात गुळाची आवक कमी असून मागणी वाढल्यामुळे गुळाच्या दरात क्विंटलमागे आणखी शंभर रुपयांनी वाढ झाली. निचांकी दरात मागणी वाढल्यामुळे खाद्यतेलांच्या दरातही डब्यामागे 25 ते 30 रुपयांनी वाढ झाली. मात्र, आवक मुबलक असून मागणी कमी असल्याने गोटा खोबरे दरात दहा किलोमागे 50 ते 100 रुपयांनी घसरण झाली. मागणी कमी झाल्याने साखरेची दरवाढ थांबली असून दरात क्विंटलमागे 25 ते 30 रुपयांनी घट झाली.

केंद्र सरकारने आयात रिफाईंड तेलावरील आयात शुल्क पाच टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खाद्यतेलांचे दर आणखी कमी होतील, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, यामुळे खाद्यतेलांच्या दरावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत बोलताना खाद्यतेलाचे प्रमुख व्यापारी चिमणलाल गुजराथी म्हणाले, भारतात आयात होणार्‍या कच्च्या खाद्यतेलांवर आयातशुल्क नाही. मात्र, रिफाईंड तेलावर साडेसतरा टक्के शुल्क आहे. यामुळे मोठया प्रमाणात कच्च्या खाद्यतेलांची आयात होते. रिफाईंड तेलाची आयात होत नसल्यामुळे या निर्णयामुळे खाद्यतेलांचे दर कमी होण्याची शक्यता नाही. उलट आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्यामुळे गेल्या आठवडयात दरात काही प्रमाणात वाढ झाली.

गेल्या आठवड्यात मागणी वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, पाम तसेच सूर्यफूल तेलाच्या दरात टनामागे 40 ते 50 डॉलर्सनी वाढ झाल्याचे वृत्त आहे. घसरलेल्या दरात खरेदीचे आकर्षण वाढल्यामुळे स्थानिक बाजारातही सर्वच खाद्यतेलांस मागणी वाढली आहे. यामुळे गेल्या आठवडयात सोयाबीन, पाम तसेच सुर्यफूल तेलाच्या दरात 15 किलोमागे 25 ते 30 रुपयांनी वाढ झाली. वनस्पती तुपही 20 रुपयांनी महागले. खोबरेल तेलाच्या दरात कोणताही बदल आढळला नाही.

साठा निर्बंधांचा गव्हावर परिणाम नाही
दरवाढीवर निर्बंध ठेवण्याकरिता केंद्र सरकारने घाऊक तसेच किरकोळ व्यापार्‍यांवर साठा निर्बंध लागू केले आहेत. घाऊक व्यापार्‍यांकरिता तीन हजार क्विंटलची मर्यादा ठरविण्यात आली आहे. ही मर्यादा मुबलक असल्यामुळे या निर्णयाचा
बाजारावर कोणताही परिणाम झाला नाही. सध्या गव्हाचे दर वाजवी पातळीवर स्थिरावले असून यापेक्षा कमी झाल्यास ते आधारभूत किमतीपेक्षा कमी होतील. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होईल. यामुळे सध्याची दरपातळी स्थिर राहाणे गरजेचे आहे, असे मत अन्नधान्यांचे प्रमुख व्यापारी राजेंद्र चांडक यांनी मांडले.

आवक जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यातही गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ तसेच आटा, रवा आणि मैद्याचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मागणी कमी असल्यामुळे गेल्या आठवड्यातही सर्वच डाळी कडधान्यांचे दर स्थिर होते. आवक मुलबक असून, मागणी कमी असल्यामुळे गोटा खोबर्‍याच्या दरातील घसरण सुरूच आहे. गेल्या आठवडयातही दरात दहा किलोमागे आणखी 50 ते 100 रुपयांनी घट झाली.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) : 3650 ते 3700 रु.
खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2700-2800, रिफाईंड तेल ः 2475-3250, सरकी तेल 1460-1700, सोयाबीन तेल 1460-1650, पामतेल 1400-1600, सूर्यफूल रिफाईंड तेल 1470-1650, वनस्पती तूप 1460-1900, खोबरेल तेल 2250-2250 रु.
तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसूरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509-8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु. गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी. लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5800, सिहोरी 3400-3800, मिलबर 2600-2700 रु. ज्वारी : गावरान नं. 1- 5500-6000, गावरान नं. 2-5000-5400, नं. 3 4500-4800, दूरी 3800-4200 रु. बाजरी : महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु., गूळ : गूळ एकस्ट्रा 4200-4300, गूळ नं. 1 4050-4150, गूळ नं. 2 3900-4000, गूळ नं.3 3750-3850 बॉक्स पॅकिंग रु. डाळी : तूरडाळ 12500-14500, हरभराडाळ 6000-6300, मूगडाळ 9500-10000, मसूरडाळ 7400-7500, मटकीडाळ 10000-11000, उडीदडाळ 11200-11300 रु.
कडधान्ये : हरभरा 5400-5500, हुलगा – 7100-7200 चवळी 7000-9000, मसूर 6600-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000-8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11500-11700, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 5500-6000, काबुली चणा 9000-15000 रु. साबुदाणा : साबुदाणा नं.1 7500, साबुदाणा नं.2 7000, साबुदाणा नं. 3 6800 रु.
वरई भगर : 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1000-1200 रु.
शेंगदाणा : जाडा 11700-12200, स्पॅनिश – 11500-11800, घुंगरु 10500-11000 रु.
धने : गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु. मका लाल : 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु.
पोहे : मध्य प्रदेश 3800-4000, पेण 3800-4000, मध्यम पोहा-3500-3800, दगडी पोहा 3600-4200, पातळ पोहा 4500-5100, सुपर पोहा 4300-4600, भाजका पोहा 525, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2750-2850, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 900-950, घोटी 430, सुरती 450 रु.
रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1500-1550, रवा 1550-1550, मैदा 1050-1550, बेसन :- (50 किलोस) 3350-3650 रु.
मीठ : मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 250 रु.
मिरची : काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 57500-60000, लवंगी तेजा 24000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु.
नारळ : (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1150-1250, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1400-1450, सापसोल 2000-2500 रु.

 

Back to top button