पुणे: नारायणगाव येथे तरुणाचा खून | पुढारी

पुणे: नारायणगाव येथे तरुणाचा खून

नारायणगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: येथील तेल ओढ्याजवळ अज्ञाताने एकाचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. २५) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. साहेबराव नामदेव भुतांबरे (वय ४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याबाबतची फिर्याद ईश्वर ज्ञानेश्वर पाटे यांनी दिली.

कोतुळ (ता. अकोला) येथील साहेबराव भुतांबरे हे कामानिमित्त नारायणवाडी (ता. जुन्नर) येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. ते वेल्डिंग, शेतमजुरी आदी कामे करून उदरनिर्वाह करत होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह नारायणवाडीजवळील तेल ओढ्याजवळ असलेल्या शेतात आढळून आला. डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला असल्याचे शवविच्छेदनात पुढे आले आहे. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद धुर्वे करीत आहेत.

Back to top button