पुणे : बायकोचा खून – चारित्र्याच्या संशयावरुन नवऱ्याचे कृत्य | पुढारी

पुणे : बायकोचा खून - चारित्र्याच्या संशयावरुन नवऱ्याचे कृत्य

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरात बायकोचा खून केल्याची घटना घडली. नवऱ्याने चारित्र्याच्या संशयावरुन हे कृत्य केले. हडपसर येथे नवऱ्याने बायकोचा गळा चिरुन खून केला पतीने पत्नीचा चाकुने गळा चिरून खून केला.

शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. अंजली नितीन निकम (वय २२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी पती नितीन बापू निकम (वय.३२,रा.सध्या रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ रा. दहिगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

याबबात अंजली यांची मोठी बहिण वैशाली गायकवाड (वय.38,रा.गाडीतळ हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन निकम याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे बायकोचा खून
संशयित नितीन निकम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन भोसरीतील एका कारखान्यात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. सहा वर्षांपूर्वी त्याचा अंजलीबरोबर विवाह झाला होता. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून तो अंजलीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणावरुन त्यांच्यात वादही झाला होता. त्यामुळे अंजली हडपसर भागातील गोसावी वस्तीत आईकडे राहण्यासाठी आली होती.

अधिक वाचा :

शनिवारी दुपारी नितीन अंजलीला मूळगावी नेण्यासाठी हडपसर भागातील सासूरवाडीत आला होता. बंटर स्कुलजवळून तो तिला दुचाकीवरून घेऊन निघाला होता. त्याने बहाणा करून दुचाकी थांबवली. त्यानंतर चाकुने तिच्या गळ्यावर वार केले. अंजली रस्त्यात कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या नितीनला पकडले. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.

हे ही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : दिलीप कुमार आणि पुण्याचे ऋणानुबंध

Back to top button