पद्म पुरस्कारासाठी नामांकने देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन | पुढारी

पद्म पुरस्कारासाठी नामांकने देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पद्म पुरस्कारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना नामांकने देण्याचे आवाहन केले. यासंबंधी ट्विट करीत पंतप्रधानांनी देशभरात तळागाळात विलक्षण कामगिरी करणार्या लोकांची नावे सूचवण्याची विनंती केली.

या पुरस्काराला पंतप्रधानांनी ‘पीपल्स पद्म’ असे नाव दिले आहे. पुरस्कारांच्या नामांकनाची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. नामांकनासाठी त्यांनी एक लिंकही शेअर केली आहे.

अधिक वाचा 

निलेश राणे : ‘शरद पवारांनी नाना पटोलेंना पान टपरी वालाचं करून टाकला’

भाजप : Google वर जाहिरातीत भाजपचा कॉंग्रेसपेक्षा सहा पट अधिक खर्च

पद्म पुरस्कारासाठी नामनिर्देशन किंवा शिफारसी केवळ ऑनलाईन घेतल्या जातील, असे एका सरकारी निवेदनातून सांगण्यात आले आहे. या पुरस्कारांसाठी सरकारने स्वतःचे नामनिर्देशित करण्याचीही तरतूद केली आहे.

‘भारताकडे तळागाळात विलक्षण कामगिरी करणारे अनेक प्रतिभावंत लोक आहेत. बर्‍याचदा, आपणाला त्यांच्याबाबत जास्त माहिती नसते. तुम्हाला असे प्रेरणादायक लोक माहित आहेत?

जर याचे उत्तर ‘होय’ असे असेल तर तुम्ही त्यांना हॅशटॅग पीपल्स पद्म साठी नामांकन देवू शकता. नामांकनाची शेवटची तारीख १५ सप्टेंबर अशी आहे, असे ट्विट पंतप्रधानांनी केले.

अधिक वाचा 

लखनऊमध्‍ये ‘एटीएस’ची मोठी कारवाई, दोन दहशतवादी जेरबंद

समान नागरी कायदा हा केंद्राचा विषय, शरद पवार यांचे भाष्य

पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत.

पद्म पुरस्कारांच्या शिफारसी राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मंत्रालये , उत्कृष्ट संस्था इत्यादींकडून प्राप्त केल्या जातात. या शिफारसींवर पुरस्कार समिती विचार करते.

पुरस्कार समितीच्या शिफारसीच्या आधारे आणि पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर हे पुरस्कार जाहीर केले जातात.

१९५४ मध्ये या पुरस्कारांची सुरुवात झाली.

केंद्रीय गृह मंत्रालयाने सुद्धा सर्व केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि इतर पुरस्कार देणाऱ्यांना नामांकने देण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचलं का ?

Copa America स्पर्धेत मेस्सी – नेमार भावूक; व्हिडिओ व्हायरल

Twitter ने अखेर तक्रार अधिकारी नेमला; नव्या आयटी मंत्र्यांच्या इशाऱ्याने तीन दिवसात उपरती!

पाहा व्हिडिओ : सचिन खेडेकर यांच्याशी बातचित 

Back to top button