पुणे जिल्ह्यात दिवसभरात १११४ कोरोना रुग्ण, १४ जणांचा मृत्यू | पुढारी

पुणे जिल्ह्यात दिवसभरात १११४ कोरोना रुग्ण, १४ जणांचा मृत्यू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरासह जिल्ह्यात शनिवारी (दि. 10) 1 हजार 114 रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात 812 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी पुणे शहरात 320, पिंपरी-चिंचवडमध्ये 228, ग्रामीण, कॅन्टोन्मेंट, नगरपालिका भागात 566 जणांचा समावेश आहे.

आतापर्यंत 10 लाख 62 हजार 995 जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी 10 लाख 34 हजार 245 जण बरे झाले आहेत. सध्या 5 हजार 875 जणांवर रुग्णालयात व 4 हजार 794 जणांवर घरी उपचार करण्यात येत आहेत.

दिवसभरात 20 हजार 298 जणांची चाचणी करण्यात आली.

Back to top button