राज्यातील 1126 भूकरमापकांना मिळाली नियुक्ती पत्रे | पुढारी

राज्यातील 1126 भूकरमापकांना मिळाली नियुक्ती पत्रे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या भूमिअभिलेख विभागात गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या 1126 भूकरमापकांना नुकतीच नियुक्ती पत्रे विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे आता प्रलंबित असलेल्या मोजण्या लवकरच मार्गी लागतील. राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागात गेल्या अनेक वर्षांपासून भूकरमापकांची पदे रिक्त असल्यामुळे मोजण्या प्रलंबित राहिल्या आहेत.

ही बाब लक्षात घेऊन परीक्षेत पात्र असलेल्यांना आता नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. नियुक्ती मिळालेल्यांना आता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भूमिअभिलेख विभागाच्या पुणे- 252, मुंबई-230, नाशिक- 147, छत्रपती संभाजीनगर- 199, अमरावती- 126 आणि नागपूर- 170 अशी सर्व मिळून 1126 अशी पदे होती. त्या सर्वांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत.

Back to top button