गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्‍याला बेड्या, अल्पवयीन साथीदार ताब्यात | पुढारी

गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्‍याला बेड्या, अल्पवयीन साथीदार ताब्यात

पुणे, पुढारी वृत्तसेवा: लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नावे समाज माध्यमात बनावट खाते उघडून आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्‍याला विमानतळ पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली. या प्रकरणी एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेण्यात आले. आयुष अमृत कणसे (वय 21, रा. भरतगाववाडी, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका 17 वर्षीय अल्पवयीन युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

गौतमी पाटीलचे समाजमाध्यमावर बनावट खाते उघडून तिचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. तांत्रिक तपासात आयुष कणसे आणि त्याच्या साथीदाराने गौतमी पाटीलचे समाजमाध्यमावर बनावट खाते उघडून आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता माळी, सहायक फौजदार अविनाश शेवाळे, किरण खुडे, रेहान पठाण, अंकुश जोगदंड, दादासाहेब बर्डे, आस्मा शेख, रेणुका भोगावडे, प्रियंका शिंदे आदींनी ही कारवाई केली.

Back to top button