पिंपरी शहरात कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा | पुढारी

पिंपरी शहरात कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा

पिंपरी : शहरामध्ये सध्या प्रतिबंधक लसचा तुटवडा जाणवत आहे. महापालिकेने राज्य सरकारकडे लसची मागणी नोंदविली आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप लस उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सध्या महापालिकेच्या 8 केंद्रांवरील लसीकरण ठप्प पडले आहे.

दिवसभरात कोरोनाचे 32 बाधित रुग्ण
शहरामध्ये गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 32 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, सध्या 176 सक्रिय रुग्ण आहेत. महापालिकेच्या 8 केंद्रांवर कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड तसेच, कोर्बेव्हॅक्स लस देण्यात येत होत्या. मात्र, सध्या हे लसीकरण लस उपलब्ध नसल्याने बंद आहे. वय वर्ष 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी कोर्बेव्हॅक्स लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येत होता.

14 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येत होता. तर, 18 वर्षांवरील व्यक्तींना प्रिकॉशन डोस दिला जात होता. 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना पहिला, दुसरा आणि प्रिकॉशन डोस देण्यात येत होता. मात्र, सध्या लसच उपलब्ध नसल्याने कोविड प्रतिबंधक लसीकरण थांबले आहे.

महापालिकेच्या वतीने कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्य सरकारकडे लसीची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ही लस उपलब्ध झाल्यानंतर पूर्ववत लसीकरण सुरू केले जाईल.

                 – डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी

Back to top button