कामशेतमध्ये धावले 200 बैलगाडा | पुढारी

कामशेतमध्ये धावले 200 बैलगाडा

कामशेत : कामशेतमध्ये 7 ते 13 एप्रिलदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित छकडी स्पर्धेत शिवाजीराव टाकवे व शिवण्या समीर शेलार यांच्या माऊली-सर्जा या बैलजोडीला घाटाचा राजा पुरस्कार मिळाला. या जोडीने पहिल्या फेरीत सगळ्यात कमी 15.56 सेकंदात घाटाचे अंतर पार केले. या स्पर्धेत सुमारे दोनशे गाडामालकांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत दहा गाडामालकांनी सहभाग घेतला.

विजेत्यांना मानाची गदा त्यात शिवाजी शेलार (11.39 सेकंद), देवराम गायकवाड (15.64 सेकंद) व स्वप्निल तरस (15.67 सेकंद) यांचा विभागून अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक आला, स्पर्धेतील विजेत्यांना मोटारसायकल, टीव्ही, चषक, मानाची गदा इनाम म्हणून देण्यात आल्या, अशी माहिती उत्सव कमिटीचे अध्यक्ष तुषार शिंदे, रोशन शिंदे, बंटी शिंदे, मुकुंद शिंदे, ऋषिकेश शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन उत्सव कमिटीने केले होते.

Back to top button