जुनी सांगवीतील राडारोडा अखेर उचलला | पुढारी

जुनी सांगवीतील राडारोडा अखेर उचलला

दापोडी; पुढारी वृत्तसेवा : जुनी सांगवी मुळानगर येथील जुनी ड्रेनेज लाईन खराब झाल्याने काढून नवीन पाइपलाइन टाकली होती. 15 दिवसांपासून पाईप व राडारोडा जागेवर पडून होता. याबाबत ‘दैनिक पुढारी’मध्ये छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध केली होती. बातमी प्रसिद्ध होताच संबंधित विभागाने तुटलेले पाईप व राडारोडा उचलला आहे.

येथे जवळपास 30 ते 32 आरसीसी जुने पाईप व मातीचे ढिगारे तेव्हापासून तसेच पडून होते. ठेकेदारांमार्फत काम करून घेतले होते. राडरोडा जागेवरच सोडला होता. ये-जा करण्यास अडथळा स्थानिक रहिवाशांना रहदारीसाठी हाच मुख्य रस्ता आहे. तसेच वस्तीत येण्याजाण्यास अडथळा होत होता. शाळकरी व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबत याची संबधित विभागाकडे मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी तक्रार केली होती. तक्रारीची त्वरित दखल घेऊन त्वरित पाईप व राडारोडा उचलला.

Back to top button