पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने रसदार फळांची चलती | पुढारी

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने रसदार फळांची चलती

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने बाजारात लिंबू, कलिंगड, खरबूज, मोसंबी, संत्री आदी फळांना मागणी टिकून आहे. बाजारात सर्व फळांची आवक साधारण आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने कलिंगड, खरबूजाचे भाव किलोमागे दोन ते तीन रुपये, लिंबू गोणीमागे शंभर रुपयांनी वधारले आहेत. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असून दर टिकून आहेत.

रविवारी (दि. 12) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 4 ट्रक, संत्री 45 ते 50 टन, मोसंबी 35 ते 40 टन, डाळिंब 25 ते 30 टन, पपई 5 ते 6 टेम्पो, लिंबे सुमारे 1 हजार 200 ते 1 हजार 700 गोणी, पेरू 300 ते 400 क्रेटस, कलिंगड 25 ते 30 गाड्या, खरबुज 15 ते 20 गाड्या, चिक्कू 2000 गोणी तर द्राक्षांची 20 टन इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 400-1700, अननस : 100-500, मोसंबी : (3 डझन) : 280-400, (4 डझन) : 100-220, संत्रा : (10 किलो) : 300-800, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 60-250, गणेश : 10-30, आरक्ता 10-80. कलिंगड : 8-14, खरबूज : 18-30, पपई : 12-20, पेरू (20 किलो) : 300-400, चिक्कू (10 किलो) : 80-500, द्राक्षे (10 किलो) : सुपर सोनाका : 400-600, सोनाका : 350-550, जम्बो : 550-700, शरद : 400-600, माणिकचमन (15 किलो) : 400-500, थॉमसन : 350-500.

Back to top button