पिंपरी : शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा अन् मिरवणुका | पुढारी

पिंपरी : शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा अन् मिरवणुका

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध सार्वजनिक मंडळांकडून शोभायात्रा, मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मोरवाडी चौकात गुरुदत्त प्रतिष्ठानच्या वतीने आकर्षक रथ साकारण्यात आला होता. निगडीतील टिळक चौकात शिवरथ तयार करण्यात आला होता. तर पिंपरी गावातील ‘एक गाव एक शिवजयंती’ मिरवणुकीत साकारलेला देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरला.

पिंपरी कॅम्पातील शगुन चौकातून सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. यानंतर साई चौक, पिंपरीगाव, शिवाजी पुतळा चौक या मार्गाने मिरवणूक पिंपरी कॅम्प मार्गे शिवस्फूर्ती स्मारक, भैरवनाथ चौक असे मार्गक्रमण करीत पिंपरीगाव येथे समारोप झाला.
शालेय विद्यार्थिनींनी मर्दानी खेळ, लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी या ऐतिहासिक खेळांची प्रात्यक्षिके सादर करुन इतिहासकालीन युद्धकलेचे दर्शन घडविले. याबरोबरच बँन्डपथक, बाल वारकर्‍यांचे भजनी मंडळाचे पथक, ढोल-ताशांची वेगवेगळी पथके, मुलामुलींची मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, मल्लखांब व दोरखांबाची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. मिरवणुकीदरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

वारकरी पथकाने मिरवणुकीची वाढविली शोभा
मिरवणुकीत वारकरी पथकाचा देखील समावेश होता. तसेच या वेळी महिलां ज्या त्या प्रांताप्रमाणे पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सामील झाल्या होत्या. काही महिलांनी फेटे व नऊवारी साडी रणरागिणींचा वेश धारण करून मराठमोळ्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व
यांनतर बालशाहीर पुरस्कार अनुक्रमे परमवीर आव्हाड, राजरत्न पांडगळे, प्रज्ञेश गायकवाड यांना, तर महिला शाहीर पुरस्कार भारती फिस्के आणि उर्मिला राजे यांना देण्यात आले. संजीवनी महिला शाहिरीपथकाने कार्यक्रमाचे संयोजन केले. या वेळी सर्व बाल व महिला शाहीर यांनी गण, मुजरा, शिवजन्म, अफझल खान वध, बाजीप्रभू देशपांडे, नारी शक्ती असे विविध पोवाडे सादर केले. युवाशाहीर चैतन्य काजुळकर व गुरूराज कुंभार यांनी शिवगीत गात रंगत आणली.

या प्रसंगी महाराष्ट्र शाहीर परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे, दीनानाथ जोशी, संजीवनी महिला शाहिरी पथकाच्या अध्यक्षा वनिता मोहिते, संत तुकाराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष नंदू कदम उपस्थित होते. प्रचिती भिषणुरकर यांनी
सूत्रंचालन केले.

महिला, बालशाहिरांनी जिवंत केला इतिहास
संत तुकाराम प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शाहीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात बालशाहीर आणि महिला शाहीर यांनी शिवरायांचा इतिहास जिवंत केला. पिंपरीतील संत तुकाराम मंदिर येथे कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात श्री नटेश्वर नृत्यकला मंदिराच्या संचालिका शिल्पा भोळे व त्यांच्या 25 विद्यार्थी यांच्या विविध शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्यांनी झाली. सर्वप्रथम शिल्पा भोळे यांनी कृष्ण वंदना सादर केली व अभिनय पक्षात ज्ञानेश्वरांवर कथा व संत मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग सादर केले. त्यानंतर विद्यार्थिनींनी पाऊस वास्तू दारी, कुसुमाग्रज यांच्या मातीची दर्पोक्ती. श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग, विविध इतर गाण्यांवर नृत्ये सादर केली. विद्यार्थिनींचे शास्त्रीय गायन व सतीश काळे व त्यांच्या विद्यार्थ्यांचे समूह तबलावादन व जय हनुमान भजनी मंडळाचे भजन झाले.

Back to top button