गुंडाळवाडी येथे दोन दिवसांत धावले 350 बैलगाडे | पुढारी

गुंडाळवाडी येथे दोन दिवसांत धावले 350 बैलगाडे

वाडा(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : गुंडाळवाडी येथील वेताळेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त 2 दिवस बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत मुख्य आकर्षण ठरले पहिल्या दिवशी उल्हास गणपत हुंडारे व दुसर्‍या दिवशी दक्ष प्रवीण गायकवाड याचा गाडा. हे दोन्ही गाडे घाटाचा फायनल सम्राट ठरले. गुंडाळवाडी येथे येथील यात्रेत तब्बल 450 बैलगाडे धावले.

त्यामध्ये पहिल्या दिवशी प्रथम क्रमांक गंगाराम किसन कडलग यांच्या गाड्याने, व्दितीय क्रमांक आत्माराम सीताराम बोर्‍हाडे यांच्या गाड्याने, तृतीय क्रमांक पांडुरंगशेठ सावळेराम मेमाणे यांच्या गाड्याने, तर चतुर्थ क्रमांक अमोल नामदेव वाळुंज यांच्या गाड्याने मिळविला. दोन दिवसांच्या फायनल शर्यतीत पहिल्यात पहिला क्रमांक उल्हास गणपत हुंडारे, व्दितीय अक्षय खंडू नाईकडे व तृतीय जयगणेश दत्तात्रय वाळुंज यांच्या गाड्याला मिळाला. घाटाचा राजा म्हणून उल्हास गणपत हुंडारे यांचा गाडा ठरला, तर आकर्षक बारीचा बहुमान सुहास पवार यांच्या गाड्याने मिळवला.

दुसर्‍या दिवशी झालेल्या शर्यतीत प्रथम क्रमांक शांताराम आनंदराव सांडभोर यांच्या गाड्याने, व्दितीय क्रमांक नंदूशेठ बबनराव बुट्टे यांच्या गाड्याने, तृतीय क्रमांक संतोषशेठ शिवाजी उगले यांच्या गाड्याने, तर चतुर्थ क्रमांक सोन्याग्रुप बैलगाडा संघटना यांच्या गाड्याने मिळविला. फायनल शर्यतीत प्रथम क्रमांक दक्ष प्रवीण गायकवाड, व्दितीय क्रमांक नीलेश शिवाजी घनवट, तृतीय क्रमांक शंकरशेठ नाईकरे यांच्या गाड्याने मिळविला असून, आकर्षक बारीचा बहुमान मच्छिंद्र काळे यांच्या गाड्याने मिळवला.

घाटात निवेदक म्हणून पंकज शिंदे, माउली तळेकर, दामू लांडगे, माउली पिंगळे, शिवाजी कावडे, संतोष खेंगले, गोरक्षनाथ बच्चे, संभाजी कड, गणेश जोरी, प्रवीण कड, सागर साळुंखे यांनी काम पाहिले. या उत्सवाचे संपूर्ण नियोजन सरपंच फसाबाई चतूर, उपसरपंच सतीश जैद, माजी सरपंच सुजाता भोर, यात्रा कमेटीचे अध्यक्ष दत्ता राखुंडे, मा. सरपंच अरुण आण्णा गुंडाळ, बाबुराव भोर, पोलिस पाटील संतोष भोर, सुनील जैद, गणेश भोर, सुरेश जैद, बंडू भोसले, पंढरिनाथ जैद, महेश राखुंडे, गणेश राखुंडे, संगीता तनपुरे, बाळासाहेब जैद, दीपक कालेकर, रवी बुरसे, चंद्रकांत भोर, कल्पना राक्षे तसेच यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ, युवक तरुण मंडळ, पुणेकर व मुंबईकर यांच्या वतीने करण्यात आले होते.

Back to top button