पुणे : मतदानासाठी लंडनमधील ‘ती’ आली थेट पुण्यात ! | पुढारी

पुणे : मतदानासाठी लंडनमधील 'ती' आली थेट पुण्यात !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लहानपण पुण्यात गेले, आता मी लंडन येथील मँचेस्टर येथे राहते. आज मतदानासाठी पुण्यात आले आहे. मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते सर्वांनी बजावले पाहिजे. मतदानाचा हक्क कोणीही गमावू नका, असा संदेश लंडनहून पुण्यात मतदानासाठी आलेल्या अमृता देवकर यांनी रविवारी दिला.

अमृता देवकर या खास कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी पुण्यात आले आहेत. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी प्रशालेत येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. त्यांनी यावेळी पुण्यातील विविध आठवणींना उजाळा दिला.

Back to top button