पुणे : नरवीर तानाजी मालुसरे यांना भारतीय सैन्य दलाचे अभिवादन | पुढारी

पुणे : नरवीर तानाजी मालुसरे यांना भारतीय सैन्य दलाचे अभिवादन

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानदिनी शनिवारी (दि. 4) सिंहगडावर भारतीय सैन्य दलाच्या ’मराठा लाइट इंन्फट्री’च्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या बलिदानस्थळी या वेळी पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. छत्रपती शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. परकियांच्या गुलामगिरीतून रयतेची मुक्तता करून लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती केली.

नरवीर तानाजी मालुसरे व वीर मावळ्यांच्या अतुलनीय शौर्याला सैन्य दलाचे अधिकारी, जवान व शिवप्रेमींनी उजाळा दिला. सिंहगड, पानशेत भागांतील मावळ्यांसह विविध शिवप्रेमी संघटनांंच्या वतीने नरवीर  तानाजी मालुसरे यांना पुष्पहार, पुष्पांजली अर्पण करून वंदन करण्यात आले. धायरी येथील शिवभक्त बाबुराव पोकळे व परिवाराच्या नरवीर तानाजी मालुसरे समाधी व स्मारकावर फुलांची सजावट करण्यात आली. राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, माजी  सरपंच विश्वनाथ मुजुमले,  उपसरपंच अमोल पढेर यांच्यासह शिवप्रेमी, दुर्गप्रेमी सहभागी झाले होते.

Back to top button