पुणे : रस्ता ओलांडत असताना अपघातात एकाचा मृत्यू | पुढारी

पुणे : रस्ता ओलांडत असताना अपघातात एकाचा मृत्यू

पुणे, पुढारी वृत्तसेवा: रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर रस्त्यावरील वाकवस्ती येथील पुजा नर्सिंग होम समोर घडली. गणेश किसन शेंबडे (60, रा. रायवाडी, लोणी काळभोर) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी धडक देणार्‍या तेजस अरूण महाडीक (रा. शिंदवणे, वळती फाटा, हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button