पुरंदर विधानसभा राष्ट्रवादी स्वबळावर लढविणार | पुढारी

पुरंदर विधानसभा राष्ट्रवादी स्वबळावर लढविणार

नायगाव(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : विधानसभेसोबतच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांची आगामी विधानसभेचे उमेदवार म्हणून घोषणा देखील करण्यात आली आहे. पारगाव मेमाणे येथे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी कोणत्याही पक्षाशी युती अथवा आघाडी न करता विधानसभेसोबतच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

आगामी विधानसभेचा उमेदवार म्हणून माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांची घोषणा देखील सर्वानुमते करण्यात आली.
पुरंदर तालुक्यात शरद पवार यांना मानणारा युवावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील पहिल्या फळीतील सर्वच वरिष्ठ नेत्यांनी विविध विकासकामे व वैयक्तिक लाभांच्या योजनेतून पक्षबांधणी मजबूत ठेवली आहे.अजिंक्य टेकवडे, पुष्कराज जाधव, योगेश फडतरे, विराज काकडे, हृषीकेश झेंडे, बाळासाहेब भिंताडे, गौरव कोलते, सौरभ कुंजीर, संदीप चिकणे, चेतन मेमाणे, राहुल गिरमे, बाळासाहेब भिंताडे व इतर दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांनी पक्षासाठी तितकीच मोलाची साथ दिली आहे.

यामुळे वरिष्ठ व युवकांच्या मदतीने आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा दिलेला नारा राष्ट्रवादी पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहे, यात शंका नाही. मेळाव्याला संबोधित करताना माजी आमदार अशोक टेकवडे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी अध्यक्ष विजय कोलते, तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे यांनी पक्षाची ध्येयधोरणे व पक्षवाढीसाठी करावयाची कामे आदीबाबत मार्गदर्शन केले.

Back to top button