पुणे : पोटनिवडणुकीसाठी गाफील राहून चालणार नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

पुणे : पोटनिवडणुकीसाठी गाफील राहून चालणार नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ या दोन्ही निवडणूका बिनविरोध कारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्व पक्षांनी निवडणूक होणार हे सूचित केल्याने आमच्या कार्यपद्धतीनुसार गाफीलन राहता आम्ही तयारीला लागलो आहोत असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

पुढे ते म्हणाल, खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढणार असून शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली ही पोटनिवडणूक चालेल. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो, इच्छुक उमेदवार हा इच्छा व्यक्त करत असतो उमेदवारी दिल्या नंतर त्यांची नाराजी राहणार नाही असेही पाटील म्हणाले. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याना वंदन करतो, आम्ही सर्वजण हे मानणारे आहोत कि बाळासाहेबांचे महाराष्ट्रवर, महाराष्ट्राच्या विकासावर, हिंदुत्वाच्या रक्षणामध्ये एक मोठं योगदान आहे.

त्यामुळे त्यांना मी अभिवादन करतो आणि या पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाली असे घोषित करतो. कसबा पेठ हा आपला परंपरागत मतदार संघ जरी असला तरी अधिक मार्जिनने ही निवडणूक कशी जिंकता यईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. उमेदवारांबाबत भाजप कोअर कमिटी निर्णय घेईल असे पाटील म्हणाले. या पोटनिवडणुकीसाठी तीन समित्या केल्या असून यामध्ये आमदार माधुरीताई मिसळ प्रमुख असतील आणि माजी खासदार संजय नाना काकडे, गणेश बिडकर, हेमंत रासने, धीरज घाटे हे प्रमुख समिती मध्ये असतील.

Back to top button