महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार झालायं ; सण, उत्सव धुमधडाक्यात साजरे करा : आरोग्यमंत्री सावंत | पुढारी

महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार झालायं ; सण, उत्सव धुमधडाक्यात साजरे करा : आरोग्यमंत्री सावंत

पुणे, पुढारी ऑनलाइन : चीनमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. यामुळे भारतासह महाराष्ट्रातही चिंतेची परिस्थिती निर्माण झाली असून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याचीही चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार झाला आहे. भारताची आणि महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये हर्ड ह्मुनिटी चांगली तयार झाली आहे. भारतामध्ये लसीकरणही चांगले झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत काहीही काळजी करण्याचे कारण नाही. तरीही राज्याच्या आरोग्य विभागाने सर्वतोपरी तयारी केली आहे, असे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.

आगामी सण, उत्सव, ख्रिसमस आणि नवीन वर्ष धुमधडाक्यात साजरे करा, असे आवाहन आरोग्यमंत्री सावंत यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले. आमदार जयकुमार गोरे यांची विचारपूस करण्यासाठी मंत्री तानाजी सावंत रुबी हॉस्पिटलमध्ये आले होते. ते म्हणाले, आमदार गोरे यांची प्रकृती उत्तम आहे, घाबरण्याचे काही कारण नाही. ते माझ्याशी देखील बोलले, आणि हसत हसत बोलले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम ठणठणीत उत्तम असल्याचे मंत्री सावंत म्हणाले

हेही वाचलंत का ? 

Back to top button