अनिल परब यांचा सोमय्यांना इशारा; माफी मागा, अन्यथा १०० कोटींचा दावा

किरीट सोमय्या आणि अनिल परब
किरीट सोमय्या आणि अनिल परब
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन : किरीट सोमय्या यांच्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १०० कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनीही तसाच इशारा दिला आहे.

७२ तासांच्या आत सर्व ट्विट डिलिट करून बिनशर्त माफी मागावी अन्यथा १०० कोटींचा दावा ठोकू असा इशारा परब यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

परिवहन विभागातील बदली, पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनिल परब यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

याप्रकरणी आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना तब्बल १०० कोटीच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे.

नोटिशीत ७२ तासाचा अवधी दिला आहे. या ७२ तासांत सर्व ट्विट डिलीट करून बिनशर्त माफी मागावी, असा इशारा दिला आहे.

सोमय्या यांच्या सततच्या बेछुट आरोपांमुळे अनिल परब यांची प्रतिमा मलिन होत असल्याचं देखील नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे.

अनिल परब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नते आणि मंत्री आहेत. मेहनत करून त्यांनी समाजात प्रतिष्ठा मिळवली आहे.

मात्र किरीट सोमय्या यांच्या निराधार आरोपांमुळे प्रतिमा डागाळत असल्याचा उल्लेख नोटीशीत आहे. त्यामुळे १०० अनिल परब यांनी कोटी रुपयांचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

सोमय्या यांनी काय आरोप केले आहेत?

अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बेकायदा बांधकाम केले आहे.

'अनिल परब यांच्यावर ताबडतोब फसवणूक करण्यासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग केला.

लॉकडाऊनच्या नियमांना डावलून २०२०मध्ये तीनमजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.

अनिल परब यांनी १९ जून २०१९ रोजी पुण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर जागा घेतली.

१ कोटींमध्ये ही जागा घेतली. खरेदीखत शेतजमीन म्हणून झाले. सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून आहे.

पण सातच दिवसांत अनिल परब यांनी २६ जून २०१९ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं.

जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचे म्हटले आहे. पण तो दाखला दाखवलेला नाही.' असे किरीट सोमय्या या म्हणाले होते.

हेही वाचा: 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news