येरवड्यात दुहेरी खून ; दोघेही सराईत गुन्हेगार | पुढारी

येरवड्यात दुहेरी खून ; दोघेही सराईत गुन्हेगार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : येरवडा येथील पांडू लमाणवस्ती परिसरात शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास दोघा सराईत गुन्हेगारांचा खून झाल्याची घटना घडली. पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडल्याची पोलिसांची माहिती आहे. अनिल उर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड अशी खून झालेल्या दोघांची नावे असल्याचे समजते. तलवार, कोयत्याने वार करून खून झाल्याची माहिती आहे.
खुनाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वस्तीतील शंकर चव्हाण नावाच्या व्यक्तीबरोबर पूर्वीच्या वादातून सुभाष राठोड याचे वाद होते. त्याच कारणातून शनिवारी मध्यरात्री वाद झाला त्यावेळी चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी अनिल वाल्हेकर आणि सुभाष राठोड या दोघांना धारदार शास्त्राने मारहाण केली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर त्यांचा अन्य एक साथीदार देखील गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी एरोडा पोलिसांनी खून कोणाचा प्रयत्न अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे

Back to top button