शेळगाव येथून निघाली ब्रिटिशकालीन रथातून “श्री” ची सवारी | पुढारी

शेळगाव येथून निघाली ब्रिटिशकालीन रथातून "श्री" ची सवारी

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या संजीवनी समाधीस्थळ असलेल्या शेळगाव (ता. इंदापूर) येथे श्री संत मुक्ताबाई यात्रा भक्तीमय व उत्साही वातावरणात पार पडत आहे. यात्रा उत्सवातील तिसऱ्या दिवशी ८ नोव्हेंबरला संध्याकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फटाक्यांची अतिषबाजी करीत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ३०० वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन रथातून “श्री” ची मिरवणूक मोठ्या उत्साही वातावरणात काढण्यात आली.

कोरोनाच्या कालावधीनंतर प्रथमच श्री संत मुक्ताबाईचा यात्रा उत्सवाला रविवार (दि. ६) पासून सुरुवात झाली असून मंगळवारी पहाटे मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी तसेच संत मुक्ताबाईच्या समाधीस्थळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष ईश्वर शिंगाडे व राणी ईश्वर शिंगाडे महाअभिषेक पूजा व आरती झाली. तसेच दिवसभर मंदिरात भजनाचा कार्यक्रम पार पडला व रात्री श्री संत चोखामेळा महाराज मंदिर ह.भ.प. सुमन तरडे यांचे कीर्तन सेवा झाली.

रात्री १० वाजता छबीना पार पडला, तसेच महादेव मंदिर या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम झाला. यात्रेनिमित्त शेळगाव लमानवस्ती येथील युवकांनी पंढरपूर ते शेळगाव पायी ज्योत आणली. त्यानंतर सुवर्णा काळे यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला. कोरोना काळानंतर प्रथमच शेळगाव श्री संत मुक्ताबाईची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. चालू वर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी व यात्रेसाठी हजेरी लावलेले दिसून येत आहे. यात्रा उत्सवात वालचंदनगर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे व सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, बीट हवालदार कसपटे,bहवालदार शैलेश स्वामी व परिमल मानेर तसेच शेळगाव येथील ग्रामसुरक्ष दलातील जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

 

Back to top button