येरवडा कारागृहात राडा; पाच जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

येरवडा कारागृहात राडा; पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट ७ जवळ असलेल्या बरेक नंबर २७ ते ३१ या बॅरिक जवळ कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे. जुने कैदी आणि नवीन कैद्यी यांच्यामध्ये एकमेकावर तुफान दगडफेक झाली असून दगडफेक सुरू असताना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदारांला कैद्याच्या जमावाने मारहाण केली आहे.

कारागृहात दगडफेक आणि हाणामारी करत राडा घातल्या प्रकरणी समीर शकील शेख, तरंग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव या कैद्यांवर येरवडा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

Back to top button