विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे, भोसरीत नागरिक मेटाकुटीला | पुढारी

विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे, भोसरीत नागरिक मेटाकुटीला

भोसरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही कमी दाबाने व विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे. मागील काही दिवसांपासून कमी वेळ पाणी येणे, कमी दाबाने येणे, पाणीच न येणे, गडुळ पाणी अशा समस्येने भोसरी परिसरातील नागरिक तसेच महिला वर्ग हैराण आहेत. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांचे हित लक्षात घेता कायमस्वरूपी या समासेतून सुटका करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.

भोसरी परिसरात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभाराचा फटका भोसरीकरांना सोसावा लागत आहे. भोसरी भागातील नागरिकांना मागील अनेक दिवसापासून पाणी समस्याला जावे लागत आहे. पाणीपुरवठा भोसरी परिसरात अत्यंत बेभरवशाचा झाला आहे. पाणीपुरवठा विभागाकडून ठराविक वेळेत विभागवार पाणी सोडण्यात येते. यामध्येही सोडण्यास उशीर होतो. परंतु, बंद करण्याची वेळ मात्र कसोशीने पाळण्यात येते. परिणामी कधी अर्धा तास तर कधी नळाळा पाणी वॉलमॅन सोडेल याचा भरवसा नसतो. काही कारणास्तव नेमून दिलेल्या वेळेत पाणी सोडण्यात आले नाही तर कामगार महिला वर्गाला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने दुसर्‍या दिवशी नागरिकांना पाणीपुरवठा पासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र भोसरी परिसरात पाहावयास मिळत आहे. परिसरात अनेक ठिकाणी दाट लोकवस्ती असल्याने नगरपालिकेच्या पाण्याशिवाय अनेकांना दुसरा पर्याय नाही. मात्र पालिका प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दिलेल्या वेळेत पाणी येत नाही. पाणी सोडणारे (वॉलमॅन ) त्यांचा मर्जी नुसार व कमी व उच्च दाबणे पाणी सोडतात. पालिकेच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. अनेक महिन्यापासून ह्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील भागातील पाण्याचा प्रश्न तातडीने सुटणे गरजेचे आहे.
– त्रस्त महिला

इ क्षेत्रीय कार्यालयाचे पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता राजेश जगताप यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले इ क्षेत्रीय कार्यालयात मोबाईल रेंज प्रॉब्लेम आहे. शेड्यूल नुसार पाणी सोडण्यात येते. वॉलमन पालिकेच्या सूचनेनुसार पाणी सोडत असतो.

Back to top button