पिंपरी : रस्ता रुंदीकरणात लागली बसथांब्यांची वाट | पुढारी

पिंपरी : रस्ता रुंदीकरणात लागली बसथांब्यांची वाट

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: वाल्हेकरवाडी याठिकाणी रस्ता रुंदीकरणाच्या वेळी रस्त्यावरील सुस्थितील बसथांबे काढण्यात आले आहेत. मात्र, योग्य पद्धतीने बसथांबे न काढता त्यांची मोडतोड करण्यात आल्यामुळे हे बसथांबे वापरहीन झाले आहेत. मनपा शाळेच्या पटांगणात बसथांबे पडून वाल्हेकरवाडी परिसरात रस्ता रुंदीकरणानंतर काढण्यात आलेले बसथांबे पुन्हा त्याजागी लावण्यात येणार होते; पण जेसीबीने बसथांबे काढताना त्यांची मोडतोड झाली आहे. त्यांचा पुन्हा वापर होणे शक्य नाही. हे बसथांबे मनपा शाळेच्या पटांगणात गेली कित्येक दिवस पडून आहेत. त्यामुळे लाखो रूपये खर्च करुन बसविलेले बसथांब्यांची पुरती वाट लागली आहे.

प्रवाशांची गैरसोय
बसथांबे नसल्यामुळे प्रवाशांना उन्हात व पावसात ताटकळत उभे रहावे लागते. तसेच बस वेळेत न आल्यास बसथांब्यावर बसण्याची सोय असते. अशा प्रकारे चांगल्या स्थितीतील बसथांब्यांची वाट लागल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसथांब्यांच्या जागी नवीन बसथांबे बसवावेत, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Back to top button