दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक लाच घेताना जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच केली कारवाई | पुढारी

दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक लाच घेताना जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच केली कारवाई

दौंड, पुढारी वृत्तसेवा: दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या कार्यालयातच रंगेहात पकडले. हा प्रकार सोमवारी (दि. १७) सकाळच्या सुमारास घडला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्राकरिता अर्ज केला होता. याचे प्रमाणपत्र देण्याकरिता अनेकदा त्यांनी डॉ. डांगे यांच्याकडे मागणी केली होती. परंतु डॉ. डांगे यांनी त्यांना वेळोवेळी वेगवेगळी उत्तरे दिली. अखेर मला पाच हजार रुपये द्या, मी प्रमाणपत्र देतो असा निरोप त्यांनी त्यांच्या शिपायामार्फत तक्रारदाराला पाठवला. तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपतपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. या विभागाच्या पथकाने उपजिल्हा रुग्णालयात सापळा लावला. तक्रारदारांनी त्याच्या हातात पाच हजार रुपये देताच डॉ. डांगे यांना रंगेहात पकडण्यात आले

डॉ. संग्राम डांगे यांचा अनेक दिवसांपासून दौंड शहरातील अनेक पक्षाचे राजकीय नेते तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होता. त्यांच्या तक्रारी वरिष्ठ अधिकारी, खासदार यांच्याकडे मांडण्यात आल्या होत्या. परंतु राजकीय वरदहस्त असल्यामुळे डॉ. डांगे यांच्यावरील तक्रारीची कोणीही दाद घेत नव्हते. अखेर सोमवारी त्यांच्यावर लाच लुचपतपत विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली.

Back to top button