पुणे : चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम वेगात; सध्या 50 ते 60 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण | पुढारी

पुणे : चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम वेगात; सध्या 50 ते 60 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: एसटीच्या पुणे विभागाच्या ताफ्यात लवकरच 17 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेले 17 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम एसटीच्या पुणे विभागाच्या मुख्यालयामागे युध्दपातळीवर सुरू आहे. सध्या हे काम 50 ते 60 टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेले आहे. पुण्यातून दीड महिन्यापूर्वी पुणे-नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक शिवाई एसटी बस सुरू झाली. या गाडीचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. त्यानंतर लगेचच महामंडळाने पुण्यात आणखी 17 ई-एसटी बस पुणे विभागाला देण्याचे नियोजन केले आहे.

एसटीच्या पुणे विभागात येत्या काही दिवसांत 17 ई-बस दाखल होणार आहेत. या गाड्या कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे या मार्गांवर धावतील. त्यांच्या चार्जिंगकरिता 17 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.
                                                                   – रमाकांत गायकवाड,
                                                      विभाग नियंत्रक, एसटी, पुणे विभाग

पुणे परिसरात एकूण 22 चार्जिंग स्टेशन
एसटी पुणे विभागीय कार्यालय : 17 चार्जिंग स्टेशन

पुणे स्टेशन एसटी स्टँड : 5 चार्जिंग स्टेशन

Back to top button