पुण्यात पावसाने दाणादाण; एक ठार | पुढारी

पुण्यात पावसाने दाणादाण; एक ठार

पुणे : पुणे शहर परिसर व पिंपरी-चिंचवड भागात शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. येरवडा भागात रिक्षावर झाड पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी पाच ते सात या वेळात शहरासह पिंपरी-चिंचवड भागात पाऊस झाला.

पुणे शहर व परिसरात पावसाचा जोर खूपच होता. त्यामुळे रस्त्यांवर एक फुटापेक्षा जास्त पाणी वाहत होते. त्यामुळे शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाडपडी झाली. येरवडा भागात रस्त्यावरून जाणार्‍या रिक्षावर झाड पडल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षाचालकाचा जागेवर मृत्यू झाला.

Back to top button