राजगुरूनगर : जिद्द, चिकाटी, सचोटीने राजेंद्र वाळुंज यशस्वी; आ. दिलीप मोहिते पाटील | पुढारी

राजगुरूनगर : जिद्द, चिकाटी, सचोटीने राजेंद्र वाळुंज यशस्वी; आ. दिलीप मोहिते पाटील

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा: जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक कष्टाने राजेंद्र वाळुंज यांनी उद्योग व सहकार क्षेत्रात करिअर घडवले. सर्वांबरोबर घेऊन प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी राजेंद्र वाळुंज हे समाजातील आदर्श आहेत, असे गौरवोद्गार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी काढले. राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज व त्यांचे बंधू अधिकारी दिनेश वाळुंज यांच्या वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छा देताना आमदार मोहिते पाटील बोलत होते.

हॉटेल राजरत्नच्या सभागृहात रविवारी (दि.25) अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखाताई मोहिते पाटील, शांताराम सोनवणे, निशाताई वाळुंज, वृषाली वाळुंज, माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, किरण मांजरे, सतीश नाईकरे पाटील, राजेंद्र सांडभोर, सुभाष होले, देवराम सोनवणे आदींसह बँकेचे संचालक, अधिकारी, सभासद यावेळी उपस्थित होते. निर्मल बालविकास संस्थेच्या विद्यार्थ्यांना यावेळी मदत देण्यात आली.

राजगुरूनगर बँकेची निवडणूक सुरू आहे. त्यात आपल्या नेतृत्वाखाली एक पॅनेल असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, असा समर्थक म्हणून आपला कोणत्याही प्रकारचा पॅनेल नाही. सर्व उमेदवार जवळचे सहकारी असून शक्य झाल्यास आपण बिनविरोध निवडीसाठी माझे प्रयत्न असतील.
                                                     – दिलीप मोहिते पाटील, आमदार.

राजगुरूनगर बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 36 कोटी रुपयांचा नफा झाला. संस्थेची आर्थिक स्थिती चांगली आहे. भविष्यात शेड्यूल्ड बँक करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. बँकेच्या प्रगतीचा आलेख पाहता योग्य संचालक मंडळ बँकेवर असणे गरजेचे आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आमच्या परिवाराला कौटुंबिक अर्थाने आदराचे स्थान दिले.
                                                            -राजेंद्र वाळुंज, अध्यक्ष, राजगुरूनगर बँक.

Back to top button