एनसीएलने शोधले हृदय रोगावरील स्फटिक स्वरूपातील गुणकारी औषध | पुढारी

एनसीएलने शोधले हृदय रोगावरील स्फटिक स्वरूपातील गुणकारी औषध

पुणे, पुढारी वृत्तसेवा: क्रॉनिक हार्टफेल्युअरवर गुणकारी ठरणारे एन्ट्रेस्टो औषधीचे नवीन हाइट्रेट एनसीएलने शोधले असल्याचा दावा वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (सीएसआयआर- एनसीएल) ने केला आहे. पुणे येथे २०१८ मध्ये नवीन स्फटिकरुपीय हायड्रेट संरूपे आणि एन्ट्रेस्टोच्या विविध संरचनावर तत्कालीन संचालक प्रा. अश्विनी कुमार नांगिया व भौतिक आणि रसायनशास्त्र विभागातील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. राजेश जी. गोन्नाड यांच्या नेतृत्वात संशोधन सुरू केले गेले होते. या संशोधनाबद्दल नुकत्याच रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री जनरल मध्ये त्यांचे हे क्रिस्टल अभियांत्रिकी आणि ड्रग पॉलिफॉर्मोशी संबंधित संशोधन प्रकाशित झाले आहे.

शास्त्रज्ञांनी इंट्रोस्ट्रोचे स्पटकीय सहा वेगवेगळे प्रकार यशस्वीरित्या शोधले आहे. यामध्ये पाण्याचे प्रमाण भिन्न असून क्रियाशील फार्मासिटिकल घटक आणि वलसाल्टन आणि सक्युबिट्रेल त्यांच्या अनायनिक अवस्थेत सोडियम आयन सोबत एकत्र असतात. इंटरेस्टच्या विविध प्रकारांमध्ये २.० ते ३.२ टक्के पाणी असते आणि वेगवेगळ्या तापमान आणि आद्रतेमध्ये स्थिरता दाखवते. जे त्यांच्या दीर्घकालीन साठवण (शेल्फ लाईफ) आणि औषध जैवउपलब्धतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारचे प्रकाशित झालेले हे पहिलेच संशोधन आहे.

आयआयएससी बेंगलोर येथील एमेरिटस प्राध्यापक तसेच युनियन ऑफ क्रिस्टोलॉग्रफीचे माजी अध्यक्ष गौतम आर देसीराजू यांनी या संशोधनावर मत व्यक्त केले की, स्फटिकीय अभियांत्रिकी संशोधनात भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आघाडीवर आहे. एन्ट्रेस्टो है गंभीर रुग्णांमध्ये दीर्घकालीन हृदयविकार व त्या संबंधातील समस्येबाबत उपचारासाठी निर्माण केलेले जगातील सर्वाधिक विकले जाणारे औषध आहे. ज्याला अमेरिकेच्या अन्न व औषधी प्रशासनाच्या विभागाने 2015 मध्येच मान्यता दिलेली आहे. हे औषध सेक्युबिट्रील आणि व्यालसरटन पॉलीमोर्फ सुपरमॉलेक्यूलर कॉम्प्लेक्स असलेल्या इतर औषधांपेक्षा वेगळे आहे.

बाजारातील बहुतेक औषध हे एकच रेणू असणारे असतात. तर काही ठराविक मात्र असणारे डोस असतात किंवा एकापेक्षा अधिक औषधांचे मिश्रण असणारे असतात. मात्र एन्ट्रेस्टो हे औषध स्पटीकीय अभियांत्रिकी तत्वे औषधोत्पादन संबंधित काँक्रीस्टल्स वापरून डिझाईन केलेले तसेच २००० च्या दशकात पेटंट मिळणारे पहिले औषध आहे. बहुतेक औषधांचे आण्विक वजन ५०० पेक्षा कमी असते परंतु एन्ट्रेस्टोचे आण्विक वजन ५७४८ एवढे आहे.

Back to top button