पुणे : साडेसात हजार दिव्यांगांना निर्वाह भत्ता; जिल्हा परिषदेकडून चार कोटी रुपये मंजूर | पुढारी

पुणे : साडेसात हजार दिव्यांगांना निर्वाह भत्ता; जिल्हा परिषदेकडून चार कोटी रुपये मंजूर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेने अतितीव्र दिव्यांगांना प्रत्येकी दरमहा 500 रुपयांप्रमाणे प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचे मानधन देण्यात येते. जिल्ह्यातील सहा हजार 724 अतितीव्र दिव्यांगांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मानधन वितरित करण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 4 कोटी 3 लाख 44 हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना दरमहा निर्वाह भत्ता सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. या मागणीनुसार सर्वानुमते दरमहा प्रत्येकी 500 रुपयांचा निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार दरवर्षी दिव्यांग निर्वाह भत्ता देण्यात येतो. तालुकानिहाय लाभार्थी या योजनेंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मतिमंद, बहुविकलांग, अंध, मूकबधिर आदींना लाभ देण्यात येणार आहे. दरम्यान, योजनेस पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे वर्ग करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या ही शिरूरमध्ये 978 तर सर्वात कमी वेल्हे तालुक्यात 180 एवढी आहे.

Back to top button