पिंपरी : लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार | पुढारी

पिंपरी : लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करण्यात आला. ही घटना 23 एप्रिल 2019 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आळंदी, दिघी, बालेवाडी येथे घडली. याप्रकरणी महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी प्रवीण कुमार शर्मा (38, रा.पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथे फिर्यादी यांचा किरकोळ अपघात झाला होता. या अपघातामध्ये आरोपीने फिर्यादी यांची मदत केली होती. यातून दोघांची ओळख झाली. या ओळखीतून आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे अमिष दाखवून त्याच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button