चाकण : बिल्डरशी सुरू असलेल्या वादातून रस्ता अडवल्याने मृतदेहाची हेळसांड | पुढारी

चाकण : बिल्डरशी सुरू असलेल्या वादातून रस्ता अडवल्याने मृतदेहाची हेळसांड

चाकण : चाकण-तळेगाव रस्त्यावरील हॉटेल मयूर पॅलेसच्या समोर नाणेकरवाडी (ता. खेड) गावाच्या हद्दीत रुग्णालयातून मृतदेह घेऊन आलेल्या शववाहिनीला घरापर्यंत जाणे कठीण झाल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 2) घडला. या घटनेमुळे या भागात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर सुमारे तीन तासांनी रुग्णालयातून आणण्यात आलेले शव अंत्यसंस्कार करण्यासाठी संबंधित कुटुंबाच्या घरी पोहोचले.

एका बिल्डरशी सुरू असलेल्या वादातून हा रस्ता बंद करण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासनाने लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Back to top button