पुणे : चतुःशृंगी परिसरात महिलेचा मृतदेह | पुढारी

पुणे : चतुःशृंगी परिसरात महिलेचा मृतदेह

पुणेः चतुःशृंगी मंदिर परिसरातील विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह गुरुवारी आढळला. महिलेचे वय अंदाजे 40 वर्षे असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित महिलेची अद्याप ओळख पटली नसून कोणाला याबाबत काही माहिती मिळाली तर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक कपिल भालेराव यांनी केले आहे.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून साठ ते सत्तर मीटर अंतरावर एक विहीर आहे. त्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मंदिरात काम करत असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शविविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button