श्रीगणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग | पुढारी

श्रीगणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग

शेलपिंपळगाव : पुढारी वृत्तसेवा :  भोसे (ता. खेड) येथील श्रीगणेश मूर्ती आर्ट्स या ठिकाणी गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे. थोड्याच दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची तयारी बाजारपेठेमध्ये दिसून येत आहे. या वर्षी गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. मागील वर्षीच्या उत्सव साजरे करण्याच्या निर्बंधानंतर यावेळेचा गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या कच्च्या मालाच्या भावामुळे या वेळी गणेशमूर्ती तब्बल 30 ते 40% महाग विकल्या जात आहे.

Back to top button