शिरूर: जामिनासाठी बनावट कागदपत्रे; दोघांना अटक | पुढारी

शिरूर: जामिनासाठी बनावट कागदपत्रे; दोघांना अटक

शिरूर : शिरूर न्यायालयात जामिनासाठी बनावट कागदपत्रे सादर करणार्‍या दोघांना शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. संगमेश मनिकसा हलांगे यांना जामीन करण्यासाठी नागेश जोशी व प्रदीप जोशी या नावाने दोघांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्या व्यक्तींची मूळ नावे शिवाजी अशोक जाधव (पुणे) व दत्ता देवकर (रा.पारगाव, खंडाळा, जिल्हा सातारा) अशी आढळून आली.

Back to top button