Murder : भोसरीत भरदिवसा महिलेचा खून; आरोपी फरार | पुढारी

Murder : भोसरीत भरदिवसा महिलेचा खून; आरोपी फरार

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : भोसरीमध्ये एका महिलेचा भरदिवसा तिच्याच दुकानात शिरून गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (१६ रोजी) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा ब्रिजकिशोर प्रसाद (वय ३१) असं खून झालेल्या महिलेच नाव आहे. मयत पुजा यांचे लांडेवाडी येथील महात्मा फुले रोडवर ‘प्रगती कलेक्शन’ नावाचं कपड्याच दुकान असून त्याच दुकानात ही घटना घडली आहे. आज सकाळी पूजाने साडेनऊच्या सुमारास दुकान उघडले, दुकानातील साफसफाई केली. काही वेळातच दहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश करत पूजाच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यांच्यात झटापट झाली, पूजाने हल्ला केलेल्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्नही केला. दुकानाबाहेर जात काही अंतर पाठलाग केला. पण मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने पूजा दुकानाबाहेर कोसळली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुजाला रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला.

हत्येचे कारण अजुन अस्पष्ट आहे. पुजाचे कुटुंब गेली २० ते २५ वर्ष भोसरी परिसरात राहत आहे. हल्ला केलेला व्यक्ती फरार असून, त्याचा भोसरी पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा

Back to top button